महिला पोलीस अधिकाऱ्याचे अपहरण, विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी तरुणाचा दबाव

up-police

महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न सध्या देशभरात चर्चेत आहे. मात्र आता महिलांच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या महिला पोलीस अधिकारी सुद्धा सुरक्षित नसल्याची धक्कादायक घटना लखनौमध्ये घडली आहे. काही तरुणांनी मिळून महिला पोलीस अधिकाऱ्याने सिनेस्टाईल अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे.

उत्तर प्रदेशची राजधानी असणाऱ्या लखनौमध्ये पीडित महिला पोलीस अधिकारी तैनात होती. मिळालेल्या माहितीनुसार, एक तरुण महिला पोलीस अधिकाऱ्याला विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव टाकत होता. तो वारंवार पीडितेला गुन्हा मागे घेण्यासाठी त्रास देत होता. त्याचे परिणाम भोगावे लागतील, कुटुंबीयांना जीवे मारून टाकू अशा पद्धतीची धमकी त्या तरुणाने पीडितेला दिली होती. मात्र पीडित महिला पोलीस अधिकारी आपल्या निर्णयावर ठाम राहिली. त्यामुळे आरोपीने काही सहकाऱ्यांच्या मदतीने पीडितेचे अपहरण केले.

पीडित महिला पोलीस अधिकाऱ्याने बीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांची विविथ पथके आरोपींचा शोध घेत असून अधिक तपास पोलीस करत आहेत.