पोक्सो कायद्यात महिलाही होणार आरोपी, दिल्ली हायकोर्टाचा निर्णय

पोक्सो कायद्यानुसार आता महिलाही आरोपी होणार आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने याबाबत निर्णय दिला आहे. दिल्ली कोर्टाने एका प्रकरणात सुनावणी करताना म्हटले की पोक्सोमध्ये He म्हणजे फक्त पुरुष होत नाही. पेनेट्रेटिव लैंगिक हल्ला आणि गंभीर लैंगिक हल्ल्यात पुरुष आणि महिला अशा दोघांना आरोपी करता येईल.

काय आहे प्रकरण?

दिल्लीत राहणाऱ्या एका महिलेवर 2018 साली एका मुलावर लैंगिक हल्ला केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. मार्चमध्ये या महिलेवर आरोप ठरवण्यात आले होते. पण पोक्सो अंतर्गत कलम तीन आणि पाच नुसार महिलेला आरोपी करता येत नाही अशी बाजू वकिलांनी मांडली.या कलमानुसार फक्त पुरुषांनाच आरोपी ठरवता येतं कारण यात He या शब्दाचा वापर करण्यात आला आहे.

कोर्टाने मांडले महत्त्वाचं मत

कोर्टाने म्हटलं की पोक्सो कायद्याच्या कलम तीन मध्ये He अर्थ फक्त पुरूष नाही होऊ शकत. या कायद्यात महिलांचाही समावेश व्हावा. लहान मुलांवर अत्याचार रोखण्यासाठी पोक्सो कायदा बनवण्यात आला होता. मग तो पुरुष असो वा महिला त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे.

पेनेट्रेटिव असॉल्टमध्ये महिला आरोपी कशी?

उच्च न्यायालयाने म्हटल्याप्रमाणे लहान मुलांच्या गुप्तांगात कुठल्या वस्तूच प्रवेश म्हणजे लैंगिक गुन्हा आहे. गुप्तांगात लिंगप्रवेश म्हणजे लैंगिक गुन्हा होते एवढीच या कायद्याची सीमा नाही. पोक्सो अंतर्गत पेनेट्रेटिव लैंगिक हल्ला हा फक्त लिंगंसंबंधित नाही तर शरीराच्या कुठलाही अवयव या कायद्यात बसतो.