भाजप आमदाराने विधान भवनात केला बलात्कार, कर्नाटकात भाजपचे सेक्स स्कँडल

माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णाच्या सेक्स स्कँडलने देशभरात खळबळ उडाली होती. त्यानंतर आता कर्नाटकात भाजपचे सेक्स स्कँडल चव्हाटय़ावर आले आहे. भाजपचा आमदार एन. मुनीरथना नायडूने विधानसभेत आणि सरकारने दिलेल्या कारमध्ये बलात्कार केल्याचा खळबळजनक आरोप एका महिलेने केला आहे. या आमदाराने हनीट्रॅपसाठी वापर केल्याचेही महिलेने जबाबात म्हटले आहे.

गुरुवारी या महिलेने केलेल्या आरोपानंतर एफआयआर नोंदवून आरआर नगर मतदारसंघाचा आमदार मुनीरथना याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या महिलेचा उपयोग करून त्याने प्रतिस्पर्धीच नव्हे, तर भाजपमधीलही अनेकांना ब्लॅकमेल केले. एका नेत्याकडे तर एड्स झालेली महिला पाठवली, असे आरोप या पीडितेने केले आहेत. या 40 वर्षीय महिलेच्या तक्रारीनंतर मुनीरथनासह अन्य सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलात्कार, लैंगिक छळ आणि गुन्हेगारी धमकावणी अशा गुह्यांत अटक करण्यात आलेल्या मुनीरथनाला विशेष न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

n बंगळुरू महापालिकेतील एका आयएएस अधिकारी महिलेच्या सांगण्यावरून मुनीरथनाने या महिलेला ब्लॅकमेल करून आणखी एका महिलेला हनी ट्रपमध्ये अडकवण्यास भाग पाडले होते. मुनीरथना याने आयएएस अधिकाऱ्याकरवी 400 कोटींचा निधी मंजूर करवून घेतला होता, असा दावा या महिलेने केला आहे. महापालिकेने या अधिकारी महिलेच्या कार्यकाळात आरआर नगरमध्ये 2020-22 मध्ये मंजूर केलेल्या कामांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

काय आहेत महिलेचे आरोप

मुनीरथना याने मला ब्लॅकमेल केले. भाजपचे नगरसेवक व आणखी काहीजणांना हनी ट्रप करण्यासाठीही माझा उपयोग केला. त्याने विधान भवन, आणि राज्य सरकारने दिलेल्या कारमध्ये माझ्यावर बलात्कार केला. असे महिलेने जबाबात नमूद केले आहे.

धक्कादायक म्हणजे, ऑगस्ट 2021 ते मे 2023 या काळात मुनीरथना भाजप सरकारमध्ये मंत्रीही होता. मुनीरथना याने एप्रिल 2020 मध्ये त्याच्या मुत्यालानगर गोडाऊनमध्ये  बलात्कार केला आणि दोन दिवसांनी बलात्काराचा व्हिडीओ पाठवून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली आणि इतरांना हनी ट्रपमध्ये अडकवण्यासाठी मदत करण्यास भाग पाडले. मुनीरथनाने तिला त्याच्या विरोधकांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. त्याचा व्हिडीओ व्हिडीओ दाखवून तो सतत ब्लॅकमेल करत होता.

n मुनीरथनावरील आरोपांनंतर भाजपच्या राज्यातील नेत्यांकडून प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्याचवेळी काँग्रेसच्या नेत्यांनी विकास सौधाच्या प्रवेशद्वाराजवळ शुद्धीकरण पूजाविधी पार पाडले.

विरोधकाला दिला एड्सचा संसर्ग!

या पीडितेने जबाबात केलेल्या दाव्यानुसार, मुनीरथनाने तिला भाजपच्या माजी नगरसेवकाच्याच पतीलाही हनीट्रॅप करायला भाग पाडले. या व्यक्तीशी त्याचे भांडण झाले होते. त्याच्याशी लैंगिक संबंध ठेवण्यासाठी पाठवलेली महिला एड्सची रुग्ण होती. त्याच्या मुलालाही एड्सचा संसर्ग पोहोचवण्यासाठी मुनीरथनाने तिची मदत मागितली होती, पण तिने नकार दिला, असे या महिलेने म्हटले आहे.