विकिलिक्सचे संस्थापक ज्युलियन असांज यांनी दोषी असल्याचे स्वीकारले, लवकरच सुटकेची शक्यता

विकिलिक्सचे संस्थापक ज्युलियन असांज यांनी बुधवारी अमेरिकेतील सायपन येथील न्यायालयात आपण दोषी असल्याचा स्वीकार केला आहे. एएफपीच्या पत्रकारांनी ही माहिती दिली आहे. अनेक वर्षांच्या कायदेशीर नाट्यानंतर ते मुक्त होतील असं सांगितलं जात आहे.

पॅसिफिक अमेरिकेचा प्रदेश असलेल्या नॉर्दर्न मारियाना बेटांमधील न्यायालयाच्या खोलीमध्ये असांज यांनी राष्ट्रीय संरक्षण माहिती मिळविण्यासाठी आणि प्रसारित करण्यासाठी कटातील एका प्रकरणाची कबूली दिली आहे.

‘माहिती मिळवण्याच्या प्रकरणात मी दोषी आहे’, अशी कबुली असांज यांनी दिली आहे.यानंतर न्यायालयातील कार्यवाही दरम्यान न्यायाधीशांना प्रश्न केला की ते समाधानी आहेत की नाही, त्यावर असांज यांनी ‘हे सुनावणीच्या निकालावर अवलंबून आहे’, असं विनोदी ढंगानं उत्तर दिलं.

लाखो गुप्त अमेरिकी दस्तऐवज जारी केल्याबद्दल व्हिसलब्लोइंग वेबसाइट विकिलिक्सचे प्रमुख म्हणून असांज वॉशिंग्टनला फार पूर्वीपासून हवे होते.

त्यांना सोमवारी अत्यंत कडक सुरक्षा असलेल्या ब्रिटीश तुरुंगातून त्यांना सोडण्यात आले जिथे ते अमेरिकेतील प्रत्यार्पणाचा लढा देत असताना त्यांना पाच वर्षे ठेवण्यात आलं होतं.

बुधवारी, त्यांना पाच वर्षं आणि दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात येणार आहे, तेवढा काळ त्यांनी आधीच ब्रिटनधील तुरुंगात काढला आहे.

असांजची पत्नी स्टेला म्हणाली की आता ते एक ‘मुक्त व्यक्ती’ असतील. ज्यांनी त्यांच्या सुटकेसाठी मोहीम राबवली, पाठिंबा दिला अशा सर्व समर्थकांचे त्यांनी आभार मानले.

‘आम्हाला अगदी 24 तासांपर्यंत खरं वाटत नव्हतं की हे खरोखर घडत आहे’, असं त्यांनी बीबीसी रेडिओला सांगितलं. यावृत्तानं आपण आनंदी असल्याचं त्यांनी सांगितलं.

असांज अमेरिकेत जाण्यास इच्छुक नसल्यामुळे आणि ऑस्ट्रेलियाच्या जवळ असल्यामुळे नॉर्दर्न मारियाना बेटांची निवड करण्यात आली होती, असं न्यायालयात सांगण्यात आलं आहे.

सुनावणी पूर्ण झाल्यानंतर, असांज ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा येथे जातील, विकिलिक्सनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सांगितलं की, असा याचिका करार ‘कधीही व्हायला नको होते’.

ऑस्ट्रेलियन सरकारनं म्हटलं आहे की त्यांचा खटला ‘खूप लांब खेचला गेला’ आणि ‘त्यांच्या सततच्या तुरुंगवासातून काहीही प्राप्त होणार नव्हते’.

WikiLeaks Founder Julian Assange Pleads Guilty In US Court