स्कॅमर किंवा WhatsApp प्लॅटफॉर्मच्या गोपनीयता धोरणांचे उल्लंघन केल्याबद्दल तक्रार आल्यानंतर दर महिन्याला लाखो हिंदुस्थानी युझर्सवर बंदी घालते.
WhatsApp मेसेजिंग प्लॅटफॉर्मनं जाहीर केलं आहे की त्यांनी 1 एप्रिल 2024 ते 30 एप्रिल 2024 दरम्यान सुमारे 71 लाख हिंदुस्थानी अकाउंटवर बंदी घातली आहे. दुरुपयोग रोखण्यासाठी आणि प्लॅटफॉर्मची सुरक्षि राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. युझर्स नियमांचे उल्लंघन करत राहिल्यास कंपनी आणखी काही अकाउंटवर बंदी आणेल असं आश्वासन कंपनीनं दिलं आहे.
WhatsApp ने 1 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान एकूण 7,182,000 अकाउंटवर बंदी घातली. यापैकी, 1,302,000 अकाउंटकडून कोणताही अहवाल येण्यापूर्वी सक्रियपणे प्रतिबंधित करण्यात आली. गैरवर्तन रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याची भूमिका WhatsApp नं म्हटलं आहे. गैरवर्तन तपासण्यासाठी कंपनी प्रगत मशीन लर्निंग आणि डेटा विश्लेषणे प्रक्रिया राबवते.
विशेष म्हणजे, एप्रिल 2024 मध्ये, WhatsApp ला अकाउंट बंदी आणि सुरक्षा विषयांसह विविध विषयांवर 10,554 युझर्स रिपोर्ट प्राप्त झाले आहेत.
व्हॉट्सॲपने खाती बंद का केली
व्हॉट्सॲपने आपल्या युझर्ससाठी सुरक्षित वातावरण राखण्यासाठी गैरवर्तन करणाऱ्या अकाउंटवर बंदी घातली आहे. या अकाउंटवर बंदी घालण्याच्या काही प्रमुख कारणांमध्ये हे समाविष्ट आहे:
सेवा अटींचे उल्लंघन: यामध्ये स्पॅम, घोटाळे, चुकीची माहिती देणारे अकाउंट समाविष्ट आहेत.
कायदेशीर उल्लंघने: स्थानिक कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या खात्यांवरील कोणत्याही गतिविधींवर तात्काळ बंदी घातली जाते.
युझर्स अहवाल: ज्या युझर्सना अपमानास्पद किंवा अयोग्य वर्तन आढळते त्यांच्या अहवालाच्या आधारे WhatsApp कारवाई करते.