मराठी माणसाला एक रुपयाचा बिझनेस देणार नाही, असे म्हणणारा टीसी आशिष पांडेला रेल्वेने केले निलंबीत

मी मुंबईत राहूनही मी मराठी व मुस्लिम माणसांना एक रुपयाचा बिझनेस देत नाही, मी फक्त भैय्या लोकांच्या रिक्षातच बसतो, त्यांनाच धंदा देतो… अशी अरेरावीची भाषा करणाऱ्या एका टीसीला पश्चिम रेल्वेने निलंबीत केले आहे. या टीसीचा ऑडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आशिष पांडे असे त्याचे नाव आहे.

आशिष पांडे याचा एक ऑडिओ कॉल सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या ऑडिओत आशिष पांडे समोरच्या एका व्यक्तीशी अरेरावी करून बोलताना ऐकू येत आहे. ते सांगतात की मी विक्रोळीला टागोर नगरला राहतो. मी मुस्लीम आणि मराठी लोकांना बिझनेस देतच नाही. मला कोणी मराठी किंवा मुस्लीम रिक्षावाला भेटला तर मी त्यांच्या रिक्षातही बसत नाही. मी आता ट्रु कॉलरवर तुमचं नाव बघितलं तर मला तुम्ही महाराष्ट्रीय असल्याचे समजले. मी 9 वाजता कामाला जातो आणि 10 वाजेपर्यंत 5 हजार रुपये कमावलेले असतात. मला पैशांचा गर्व नाही, पण मी तुम्हाला हे सांगतोय. त्यामुळे मी ठरवलं की मी तुम्हाला धंदा देणार नाही. मी मुंबईत राहून मराठी लोकांना धंदा देणार नाही, अशी मुजोर भाषा आशिष पांडे यांनी केली आहे.

जखमी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्यावर ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याच्या पायाला दुखापत झाली असून उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.