भयंकर ! गुंगीचे इंजेक्शन देऊन नराधम डॉक्टरचा महिला रुग्णावर बलात्कार

पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगना जिल्ह्यात उपचारासाठी आलेल्या महिलेवर डॉक्टरने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलिसांनी त्या डॉक्टरला अटक केली असून ही घटना डॉक्टरच्या क्लिनीकमध्ये घडली आहे. त्यानंतर बलात्काराचे फोटो, व्हिडीओ काढून तिला ब्लॅकमेल करुन तिच्यावर वारंवार बलात्कार केला. शिवाय फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देत होता.

महिलेने सांगितले की, तिला त्या डॉक्टरने गुंगीचे इंजेक्शन दिले होते. त्यासोबत डॉक्टरने आपल्या क्लिनीकमध्ये अनेकदा बलात्कार केला. नूर आलम सरदार असे त्या डॉक्टरचे नाव असून पोलिसांनी मंगळवारी डॉक्टरला अटक केली. आरोपी डॉक्टरने महिलेला अनेकदा ब्लॅकमेल करत तिच्याकडून 4 लाख रुपयांची मागणी करत होता. पैसे न दिल्यास तिचे खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला हसनाबाद परिसरातील तिच्या घरी एकटी होती. तिचा नवरा कामानिमित्त परदेशात असतो. पिडीतेने आपल्यासोबत घडलेला प्रकार नवऱ्याला सांगितला. तो तत्काळ हिंदुस्थानात परतला आणि दाम्पत्याने डॉक्टर विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.

महिलेच्या पतीने सांगितले की, माझी बायको उपचारासाठी डॉक्टर नूर आलम यांच्याकडे जायची. मागच्या वेळी जेव्हा दवाखान्यात आली त्यावेळी तिला एक इंजेक्शन घ्यायला सांगितले. ती इंजेक्शन घेऊ इच्छित नव्हती, मात्र डॉक्टरांनी लवकर बरे व्हायचे असेल तर इंजेक्शन घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. इंजेक्शन दिल्यानंतर तिला झोप आली. ज्यावेळी तिला शुद्धी आली त्यावेळी कळले की, तिच्यावर बलात्कार झाला आहे. माझ्या बायकोला ब्लॅकमेल करुन तिला जीवे मारण्याची धमकी दिली.

एसपी हुसैन मेहदी रहमान यांनी सांगितले की, महिलेकडून तक्रार मिळाल्यानंतर आम्ही तपास सुरु केला होता. एफआयआर दाखल केल्यानंतर काही तासातच मुख्य आरोपीला अटक करण्यात आली. न्यायालयाने नराधम डॉक्टरला पोलीस कोठडीत पाठवले असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.