आम्ही शरद पवारांसोबतच; राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीत व्यक्त केला निर्धार

मंडणगड, दापोली ते राजापूरपर्यंत सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची विस्तारीत कार्यकारिणी बैठक पक्षाचे निरिक्षक बबन कनवजे व निरिक्षक शेखर माने यांच्या उपस्थितीत देवरुखमधील मराठा भवन येथे पार पडली. जमलेल्या सर्वांनी आपण राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठीशी एकनिष्ठ उभे आहोत अशी सर्वांसमोर ग्वाही दिली. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडलेल्या घडामोडीमुळे रत्नागिरी जिल्ह्यात काही फरक पडणार नाही. सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे शरद पवार यांच्याच पाठीशी आहेत.

या बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष पदापासून ते सर्व तालुकाध्यक्ष पदापर्यंतच्या विषयावर पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली व लवकरच कार्यकारीणी जाहीर करु असे पक्ष निरिक्षक बबन कनवजे यानी सांगितले. या बैठकीला निरिक्षक बबन कनवजे, निरिक्षक शेखर माने, बारक्या बने, प्रदेश उपाध्यक्ष रमेश कदम, महिला जिल्हाध्यक्ष चित्रा चव्हाण, प्रदेश सरचिटणीस बशीर मुर्तझा, माजी नगरसेवक सुदेश मयेकर, माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेट्ये, नलिनी भुवड, धनश्री मोरे, नौसिन काझी, सिध्देश शिवलकर, राजाभाऊ लिमये, मोहम्मद रखांगी, प्रकाश शिवगण, दत्ता पवार, साहिल आरेकर, मनु गुरव, राजन सुर्वे, जुबेर काझी, मेहबूब मोगला, मुजफ्फर काझी, सौरभ लवदे, बापू जाधव, शमीक नाईक, निहाली नागवेकर, शमा थोडगे व इतर उपस्थित होते.