घाटकोपर, भांडुप, मुलुंडमध्ये 24 तास पाणीपुरवठा बंद

गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्प कामांतर्गत मुलुंड येथील फोर्टीस रुग्णालय ते उद्योग क्षेत्रापर्यंत गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याजवळची 1200 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी वळवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे 24 ते 25 मेदरम्यान 24 तासांसाठी घाटकोपर, भांडुप व मुलुंड विभागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ही जलवाहिनी गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याच्या उड्डाणपुलाच्या कामात अडथळा ठरत होती. दरम्यान, या परिसरातील रहिवाशांनी पाणी उकळून आणि गाळून प्यावे, असे आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

महापालिकेतर्फे दोन ठिकाणी 1200 मिलीमीटर बाय 1200 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम शुक्रवार, 24 मे रोजी सकाळी 11.30 वाजेपासून शनिवार, 25 मे रोजी सकाळी 11.30 वाजेपर्यंत (एकूण 24 तासांसाठी) मुलुंड (पश्चिम) मध्ये गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता, मुलुंड (पश्चिम) येथे हाती घेण्यात येणार आहे. या कालावधीत घाटकोपर, भांडुप व मुलुंड विभागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

घाटकोपरमधील या भागातील पाणीपुरवठा बंद

विक्रोळी गाव (पूर्व), गोदरेज प्रॉपर्टीज, गोदरेज रुग्णालय

भांडुपला या भागात पाणीपुरवठा बंद

नाहूर (पूर्व), भांडुप (पूर्व), कांजूर (पूर्व) चा संपूर्ण परिसर, टागोरनगर संपूर्ण परिसर, कन्नमवार नगर, विक्रोळी (पूर्व) येथील इमारत क्रमांक 1 ते 32 व 203 ते 217 (दैनंदिन पाणीपुरवठय़ाची वेळ मध्यरात्रीनंतर 3.30 ते सकाळी 11.30), मुलुंड-गोरेगाव जोडरस्ता लगतचा परिसर (ऐशपर्ह्ड टॉवर, रुणवाल टॉवर, पर्ह्टीस रुग्णालय ते सोनापूर वाहतूक दिव्यापर्यंतचा परिसर), सीएट टायर मार्गजवळचा परिसर (सुभाषनगर, एमएमआरडीए वसाहत), गाव रोड, दत्त मंदिर मार्ग, अंजना इस्टेट, शास्त्राrनगर, उषानगर, लाल बहादूर शास्त्राr मार्गलगतचा परिसर (भांडुप पश्चिम), सोनापूर, गावदेवी मार्ग, जंगल मंगल मार्ग, लेक मार्ग, द्राक्ष बाग, काजू टेकडी, जनता मार्केट, टँक रोड परिसर, महाराष्ट्रनगर, कोकणनगर, सह्याद्रीनगर, क्वारी मार्ग व प्रतापनगर मार्ग लगतचा परिसर.

मुलुंड येथे पाणीपुरवठा बंद

मुलुंड-गोरेगाव जोडरस्तालगतचा परिसर (मुलुंड पश्चिम), लाल बहादूर शास्त्राr मार्गलगतचा परिसर (मुलुंड पश्चिम), जे. एन. मार्ग, देवीदयाल मार्ग, क्षेपणभूमी मार्ग (डंपिंग रोड), डॉ. आर. पी. मार्ग, पी. के. मार्ग, झवेर मार्ग, एम. जी. मार्ग, एन. एस. मार्ग, एस. एन. मार्ग, आर. एच. बी. मार्ग, वालजी लाढा मार्ग, व्ही. पी. मार्ग, मदनमोहन मालवीय मार्ग, एसीसी मार्ग, बी. आर. मार्ग, गोशाळा मार्ग, एस. एल. मार्ग, नाहुर गाव.