Wardha News – धार्मिक भावना भडकवणाऱ्या नितेश राणेंना अटक करा; शिवसेनेचं राज्यपालांना निवेदन

छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्रातील संत रामगिरी महाराज यांनी धार्मिक कार्यक्रमात एका सप्ताह मध्ये वादग्रस्त विधान केले. त्यामुळे राज्यात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी मुस्लिम समाजात असंतोष पसरला आहे. त्यानंतर आमदार नितेश राणे यांनी नगरच्या निषेध सभेत 2 सप्टेंबर रोजी परत एकदा वादग्रस्त व्यक्तव्य करून या राज्यात धार्मिक भावना भडकिवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या प्रक्षोभक भाषणाप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देत राज्यपालांकडे करण्यात आली आहे.

आमदार नितेश राणे यांनी नगरच्या निषेध सभेत, बांगलादेशमधील हिंदू अत्याचार विरोधात निषेध रॅलीला संबोधन करताना मुस्लिम समाजाबाबत वादग्रस्त व्यक्तव्य केले व महाराष्ट्र राज्यात तणावाची स्थिती निर्माण केली. तरी राज्यातील या परिस्थितीवर नियंत्रणात आणण्यासाठी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने राज्यपाल यांना विनंती केली असून महाराष्ट्रात शांतता व सुव्यवस्था निर्माण झाली पाहिजे यासाठी आमदार नितेश राणेंना अटक करण्याची मागणी केली आहे.

यावेळी निवेदन देताना माजी नगराध्यक्ष चंद्रकांत घुसे, तालुका प्रमूख सतीश धोबे, सीताराम भुते, उप तालुका प्रमुख प्रकाश अनासाने, नगरसेवक मनीष देवडे, मनोज वरघणे, गजानन काटवले, भास्कर ठवरे, फिरोज खान, शकील अहमद, नितीन वैद्य, शंकर झाडे, चंदू भुते, बंटी वाघमारे, प्रशांत सुपारे, अनंता गलांडे, अतिक मिर्झा, दिनेश धोबे, अमोल वादाफळे, शंकर भोमले, गणेश डेकाटे, भास्कर ठवरे, श्रीकृष्ण रामगडे, पंकज ठाकरे, पप्पू घवघवे ,संजय खोंडे- युवासेना उपतालुकाप्रमुख, धीरज धोटे, प्रशांत कांबळे, मनीष इसनकर, हिरामण आवारी, सदानंद कोसुरकर, भास्कर मानकर, शकील अहमद, श्याम बोरधरे, आशिष जयस्वाल, भास्कर भिसे, शेख शब्दार, मारुती अराडे, सलमान रंगरेजा, करण जनेकार, दिलीप कुकडे, किसन राऊत, राहुल मोहितकर, मोहन वानखेडे, संजय सोनूरकर इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते