बीडमधील मस्साजोग गावचे संरपंच संतोष देशमुख यांची हत्या केल्या प्रकरणी तसेच पवनचक्की खंडणी प्रकरणी फरार वाल्मीक कराड मंगळवारी सकाळी पुण्यातील पाषाण येथील सीआयडी कार्यालयात शरण आला. शरण येण्यापूर्वी वाल्मीक कराडनं एक व्हिडीओ जारी केला असून त्यात त्याने, मी दोषी आढळलो तर न्यायदेवता मला जी शिक्षा देईल ती भोगायला तयार आहे, असे म्हटले आहे.
”केज पोलीस स्टेशनला खोटी खडंणीची तक्रार दाखल झाली आहे. मला अटकपूर्वचा अधिकार असतानाही. मी सीआयडी ऑफिस पोलीसांना शरण येणार आहे. संतोष देशमुख यांचे जे कुणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय द्वेषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे. मी जर त्यात दोषी आढळलो तर न्यायदेवता मला जी शिक्षा देईल ती भोगायला तयार आहे”, असे वाल्मीक कराड म्हणाला.