गुरूच्या चंद्रावर ज्वालामुखीचा उद्रेक; व्हिडीओ व्हायरल

सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणजे गुरू. गुरू ग्रहाच्या चंद्रावर ज्वालामुखीचा मोठा उद्रेक झाला आहे. याचा व्हिडीओ अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने सोशल मीडियावर शेअर केला असून हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. गुरू ग्रहाच्या तिसऱया चंद्राचे नाव ‘आयओ’ असे आहे. आयओ चंद्राच्या पृष्ठभागावरून लावा बाहेर पडताना व्हिडीओमध्ये दिसत आहे.