राम मंदिराच्या नावाने भक्तांची ऑनलाईन फसवणूक, क्यूआर कोड शेअर करून पैसे उकळल्याचा विहिंपचा आरोप

राम मंदिराचा उद्घाटन सोहळा काही दिवसांवर आलेला असताना राम मंदिराच्या नावाने भक्तांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. सोशल मीडियावर क्यूआर कोड शेअर करून राम मंदिराच्या नावाने पैसे उकळले जात आहेत. या क्यूआरसोबतच राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी तुम्हीही योगदान द्या, असा संदेश दिला जातोय. अशी तक्रार विश्व हिंदू परिषदेने केली आहे.

रामलल्लाची मूर्ती निळय़ा दगडाची
अयोध्या येथील राम मंदिराच्या गाभाऱयात विराजमान होणाऱया रामलल्लाची मूर्ती म्हैसूरचे शिल्पकार योगीराज यांनी घडवली आहे. रामलल्ला कमळाच्या फुलावर विराजमान होणार आहेत. कमळाच्या फुलासह मूर्तीची उंची सुमारे 8 फूट असेल. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, ही मूर्ती निळय़ा दगडापासून घडवली आहे. तीन शिल्पकारांनी तीन प्रकारच्या दगडांमधून तीन मूर्ती घडवल्या होत्या. यातून या मूर्तीची रविवारी निवड करण्यात आल्याचे समजते.