अयोध्येचे सुंदर रेल्वे स्थानक लोकांनी थुंकून घाण केले

मोदी सरकारने मोठा गाजावाजा करत भव्यदिव्य सोहळय़ात राममंदिराचे उद्घाटन केले. भव्य मंदिरात रामलल्लाच्या बाल स्वरूपातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली. हे मंदिर जगभरातील भाविकांचे आणि पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे. मात्र मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी अयोध्या रेल्वे स्थानकात उतरताच भाविक नाके मुरडत आहेत. पान- गुटख्याच्या पिचकाऱयांनी घाण झालेल्या स्थानकाचा मजला पाहून मोदी सरकारबद्दल प्रचंड संताप व्यक्त करत आहेत. याचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाले असून जगभरातील भाविकांकडून स्थानकातील स्वच्छतेबद्दलच्या रेल्वे प्रशासन आणि मोदी सरकारच्या अनास्थेवरून जोरदार टीका होत आहे. या रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणासाठी 12 कोटींहून अधिक खर्च करण्यात आला आहे.

व्हिडीओत काय?

व्हिडीओमध्ये सुरुवातीला अयोध्येचे नवीन रेल्वे स्टेशन दिसेल, एक सूचना फलक दिसेल. ज्यावर धूम्रपान निषेध, थुंकना मना है, ज्वलनशील पदार्ध निषेध असे लिहिलेले दिसेल, पण पुढच्याच सेपंदाला लोकांनी स्टेशनवर थुंकून घाण केल्याचे चित्र दिसेल. जागोजागी पान आणि गुटखा खाऊन थुंकल्याचे डाग दिसत आहेत. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.