Vinesh Phogat – अपात्रतेविरुद्ध निर्णय CAS ने पुढे ढकलला, ‘या’ तारखेला होणार सुनावणी

हिंदुस्थानची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटला Paris Olympics 2024 च्या 50 किलो वजनी गटातील अंतिम सामन्यात 100 ग्रॅम वजन वाढल्याने अपात्र ठरवण्यात आले होते. त्यामुळे विनेश फोगाटने या अपात्रतेविरुद्ध अपील केली होती. CAS ने यावर निर्णय दिला असून विनेश फोगाटच्या अपात्रते संदर्भात निर्णय 11 ऑगस्टला होणार आहे.