विनेश फोगाटला मिळणार ‘सुवर्णपदक’, भारतरत्नसाठीही शिफारस, कुणी केली ही घोषणा?

हिंदुस्थानची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट हिने फ्रान्समधील पॅरिस येथे ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत 50 किलो वजनी गटात खेळताना एकामागोमाग तीन सामने जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र अंतिम फेरीपूर्वी तिचे वजन 100 ग्रॅम जास्त भरल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले. त्यामुळे ती ऑलिम्पिक पदकालाही मुकली. अर्थात या निर्णयाविरोधात तिने आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादामध्ये (सीएएस) धाव घेतली असून यावरील सुनावणीही पूर्ण झाली आहे. या खटल्याचा निर्णय 13 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता जाहीर केला जाणार आहे. या निर्णयाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागलेले असताना हरयाणातील सर्वखाप पंचायतीनेही मोठा निर्णय घेतला आहे.

विनेश फोगाटला ऑलिम्पिक रौप्यपदक मिळणार की नाही हे मंगळवारी स्पष्ट होणार असले तरी तत्पूर्वीच सर्वखाप पंचायतीने मोठी घोषणा केली आहे. खाप पंचायत विनेशचे स्वागत विजेत्या खेळाडूसारखेच करेल. तसेच खापच्या वतीने तिला सुवर्णपदक देऊन गौरविण्यात येईल. खाप पंचायतीने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

हे वाचा – मनू, सरबज्योतने सरकारी नोकरी नाकारली; सुवर्णपदकासाठी खेळावरच लक्ष्य केंद्रित करणार

‘खाप पंचायतीने एक मोठा निर्णय घेतला आहे. विनेश फोगाट मायदेशी परतल्यानंतर एका भव्य सोहळ्याचे आयोजन केले जाईल. या सोहळ्यात विनेश फोगाटला सुवर्णपदक दिले जाईल. माझी मुलगी ही माझा अभिमान आहे’, असे ट्विट सर्वखाप पंचायतने केले आहे.

‘सीएएस’ने विनेशला विचारले तीन प्रश्न

विनेश फोगाटच्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे, परंतु ‘सीएएस’ने अद्याप याबाबत निर्णय घेतलेला नाही. सीएएसने विनेशला ई-मेलद्वारे तीन प्रश्नांची उत्तरे मागितली आहेत. यातील पहिला प्रश्न, तुला दुसऱ्या दिवशीही वजन करावे लागेल या नियमाची कल्पना होती का? दुसरा प्रश्न हा रौप्यपदकाशी संबंधित आहे. क्यूबन कुस्तीपटू तुमच्यासोबत रौप्यपदक शेअर करेल का? आणि तुम्हाला या याचिकेवरील निर्णय सार्वजनिकपणे जाहीर करायचा आहे की गोपनीय पद्धतीने तो जाहीर करायचा आहे? असे प्रश्न विनेशला विचारण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

अमेरिकेने नंबर वनचे सिंहासन राखले, सुवर्णपदकाची बरोबरी झाल्याने चीन दुसऱ्या स्थानी

हिंदुस्थानच्या खात्यात 6 पदकं

हिंदुस्थानच्या 117 खेळाडूंच्या ऑलिम्पिक पथकाची आपली पॅरिस मोहीम सुवर्णस्पर्शाविनाच संपली. एकीकडे एक कोटी लोकसंख्या असलेल्या छोट्या छोट्या देशांना दहा-दहा सुवर्ण पदके जिंकता आली, तर हिंदुस्थानला एका रौप्यसह सहा पदकांवरच मायदेशी परतावे लागले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये 48व्या क्रमांकावर राहिलेला हिंदुस्थान पॅरिसमध्ये 71व्या क्रमांकावर घसरला.

पॅरिसमध्ये सुवर्णस्पर्श नाहीच; हिंदुस्थानच्या 117 खेळाडूंच्या पथकाला फक्त 6 पदकेच