गद्दारांना धडा शिकवायचा आहे. कामाला लागा, 15 फेब्रुवारी पर्यंत आचारसंहिता लागणार, अशा सूचना खासदार विनायक राऊत यांनी आज येथे उपस्थित पदाधिकाऱ्यांना केल्या. दरम्यान, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी आढावा घेतला यावेळी ते उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
या बैठकीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख शैलेश परब शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते सहसंपर्कप्रमुख अतुल रावराणे जिल्हा समन्वयक बाळा गावडे, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट सावंतवाडी तालुका संपर्क प्रमुख राजू नाईक, वेंगुर्ला तालुका संपर्क प्रमुख भालचंद्र चिपकर, एसटी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अनुप नाईक, दोडामार्ग उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी सावंतवाडी तालुका प्रमुख रूपेश राऊळ, तालुका संघटक मायकल डिसोजा,उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, शब्बीर मणियार,दोडामार्ग तालुका प्रमुख संजय गवस, वेंगुर्ला महिला तालुका संघटक सौ सुकन्या नरसुले, दोडामार्ग तालुका संघटक सौ विनिता घाडी, सावंतवाडी तालुका संघटक झारापकर, दोडामार्ग युवासेना तालुका प्रमुख मदन राणे, वेंगुर्ला युवासेना तालुका प्रमुख पंकज शिरसाट तसेच विधानसभा मतदारसंघातील उपतालुकाप्रमुख विभाग प्रमुख महिला आघाडी उपस्थित होते.
यावेळी खासदार राऊत म्हणाले की निवडणुका जवळ आल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला ही जागा जिंकायची आहे. त्यामुळे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून आपण पाच वर्षात केलेले काम पटवून सांगा. काहीजण निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून खोटी आश्वासन देतील. त्यामुळे अशा भूलथापांना बळी न पडता उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभे रहा ,असे आवाहन तुम्ही जनतेला करा अशा सूचना देखील विनायक राऊत त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिल्या.
सावंतवाडी येथील हॉटेल शिल्प ग्राम मध्ये झालेल्या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांनी संघटनात्मक प्रश्न उपस्थित केले यावेळी पदाधिकाऱ्यांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले जाणार असून कोणत्याही परिस्थितीत आगामी लोकसभा निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा निवडून आणण्यासाठी शिवसैनिकानी एकजुटीने कामाला लागा असे आवाहन खासदार राऊत यांनी केले
हिम्मत असेल तर स्वतः ला किंग समजणाऱ्यांनी खासदारकी लढवावी
यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना विनायक राऊत म्हणाले, हिम्मत असेल तर स्वतः ला किंग समजणाऱ्यांनी खासदारकी लढवावी,माझे शिवसैनिक त्यांना आडवे करायला सज्ज आहेत.शिवसेना नेते तथा खासदार श्री विनायक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी यांची महत्त्वाची बैठक सावंतवाडी शिल्पग्राम येथे संपन्न झाली.