पुणे जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये ग्राम सुरक्षेला ग्रहण; यंत्रणा पुन्हा सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी

पुणे जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांमध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणेला ग्रहण लागल्याचे चित्र दिसत आहे. हे ग्रहण कधी सुटणार असे वेगवेगळ्या तालुक्यातील ग्रामपंचायत परिसरातील ग्रामस्थांना वाटत आहे. शासनातर्फे ग्राम सुरक्षा यंत्रणेमुळे गावागावात एका फोनवर घटनेची माहिती मिळत होती. मात्र या यंत्रणेला घरघर लागली त्यामुळे गेल्या काही वर्षापासून ही यंत्रणा बंद पडली आहे.

दरोडा पडणे, चोरी, शेतात काम करत असताना सर्पदंश, लांडगा तसेच बिबट्याचा हल्ला, अपघात, वाहन चोरी, शेतात किंवा घराला आग लागणे इत्यादी आपत्कालीन वेळेला 18002703600 या नंबर वरती कॉल केल्यास तात्काळ मदत मिळायची. तसेच संबंधित पोलीस स्टेशनला देखील याची माहिती तात्काळ मिळत होते. त्यामुळे घडणाऱ्या घटनेला लगेच लगाम घालता येत होता. त्यामुळे ही यंत्रणा पुन्हा सुरू करण्यात यावी अशी मागणी तालुका तालुक्यातील गावागावातील ग्रामस्थ करीत आहेत.

अनेक ठिकाणी घटना घडत असतानाच या यंत्रणेच्या माध्यमातून कॉल झाल्यानंतर त्यावेळी चोर पकडण्यास किंवा कोणत्याही आपत्कालीन वेळेस जलद गतीने मदत मिळत होती. तसेच रस्त्यावरती जरी अपघात झाला तरी यावेळी देखील ग्रामसुरक्षा यंत्राने वरून कॉल गेल्यानंतर जलद गतीने अपघातग्रस्ताला देखील मदत मिळत होती. मात्र अनेक वर्षापासून ही यंत्रणा बंद असल्यामुळे अनेक घटना रोखण्यास कोणतेही प्रकारचे मदत होत नाही. गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी मानकरवाडी, भाग्यनगर, येथे देखील चार ठिकाणी घर फोड्या झाल्या. बारामती तालुक्यातील दिपनगर, काटेवाडी, मासाळवाडी, या ठिकाणी घरफोड्या झाल्या व अनेक तोळे सोने व रोख रक्कम लांब पास करण्यात आली. बुधवारी (दि.26) रोजी बेलवाडी येथे देखील चार चार व्यक्ती हातामध्ये कोयते घेऊन व तोंडाला रूमला बांधून घरपोडी करण्याच्या उद्देशाने बंगल्याच्या चहूबजूने फिरताना सीसीटीव्ही मध्ये आढळून आले आहेत. मात्र अशावेळी ग्रामसुरक्षा यंत्रणा सर्व असणे आवश्यक आहे. मात्र पुणे जिल्ह्याच्या अनेक तालुक्यातील ग्रामपंचायती यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेचे रक्कमच न भरल्याने ही यंत्रणा बंद पडल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

ही यंत्रणा सुरू असेल तर एखादी घटना घडत असताना गावातील लोकांना या माध्यमातून कॉल केल्यास चोऱ्यांसारखे प्रकार रोखण्यास मदत होणार आहे. मात्र अनेक ग्रामपंचायतीच्या नाकारतेपणामुळे ही यंत्रणाच मोडकळीस आली आहे. मात्र अनेक ठिकाणी चोऱ्या दरोडा यासारख्या घटना घडत असताना. ही रक्कम भरण्या वाचून ही योजना बंद पडली आहे. मात्र या यंत्रणेकडे कोणाचेही लक्ष नाही मात्र ही यंत्रणा ज्यावेळेस सुरू होती. त्यावेळी मात्र चोरांचे प्रमाण कमी होते तसेच अनेक ठिकाणी या यंत्रणेमुळे फायदा देखील झाला आहे. मात्र आता ही यंत्रणा सुरू कधी होणार असा सवाल विविध तालुक्यातील ग्रामस्थ करीत आहेत.