लोकसभा निवडणूकीनंतरचे संसदेचे पहिले अधिवेशन आजपासून सुरू झाले. ससंदेचे अधिवेशन सुरू झाले कामाच्या सुरुवातीला राष्ट्रगीत वाजवण्यात आले. मात्र हे राष्ट्रगीत सुरू असताना राहुल गांधी त्यांच्या जागेवर नसल्याचे दिसून आले. त्यावरून भाजपने राहुल गांधी राष्ट्रगीतला हजर राहिले नाही आणि राष्ट्रगीत झाल्यावर सदनात हजर झाले अशी खोटी बोंब उठवली. मात्र सजग नेटकऱ्यांनी भाजपच्या या खोट्या दाव्याची पोलखोल केली.
So, Shehzada @RahulGandhi thinks he is bigger than the national anthem of our country.
He arrived late and entered the parliament just as the national anthem ended. pic.twitter.com/lpjfzvNbA7
— Vishnu Vardhan Reddy (@SVishnuReddy) June 24, 2024
राहुल गांधी हे राष्ट्रगीत सुरू असताना सदनातच होते. मात्र त्यांना यायला थोडा उशीर झाला. मात्र आपल्या जागेवर बसायला जात असताना राष्ट्रगीत सुरू झाले. त्यामुळे राहुल गांधी राष्ट्रगीताचा मान राखत जागेवरच थांबले व राष्ट्रगीत संपल्यानंतर ते जागेवर येऊन बसले. मात्र भाजपचे नेते विष्णू वर्धन रेड्डी यांनी खोटा व्हिडीओ शेअर करत राहुल गांधी यांच्याबाबत खोटी माहिती पसरविण्याचा प्रयत्न केला.
PROPAGANDA EXPOSED 🚨⚡
BJP & RW Ecosystem is spreading lies that Rahul Gandhi was not present during National Anthem
Fact : He was present & was standing at the last row corner
His face is not visible because it was covered by Sansad TV logo, but his signature white t-shirt &… pic.twitter.com/fAkvwscv8v
— Ankit Mayank (@mr_mayank) June 24, 2024