ज्येष्ठ व्यंगचित्रकार मनोहर सप्रे यांचे निधन

मनोहर सप्रे यांनी प्रबोधनकार ठाकरे, जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे, आर. के. लक्ष्मण यांच्यासोबत काम केले होते.

मनोहर सप्रे यांनी प्रबोधनकार ठाकरे, जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे, आर. के. लक्ष्मण यांच्यासोबत काम केले होते.

ज्येष्ठ व्यंगचित्रकार मनोहर सप्रे यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. चंद्रपूर येथील घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 91 कर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातकंडे असा परिकार आहे. उत्तम कक्ते, लेखक, काष्ठशिल्पकार आणि कने-कन्यजीक चळवळीतील कार्यकर्ते म्हणूनही त्यांची ओळख होती.

मनोहर सप्रे यांनी अर्ध्या शतकाहून अधिक काळ कार्यरत राहून मराठी व्यंगचित्र क्षेत्रात लक्षणीय योगदान दिले. सोबतच व्यंगचित्राकलेचा आस्वादक आणि अभ्यासक म्हणून त्यांनी विपुल लिखाण केले. त्यांनी खासगीरीत्या अभ्यास करून नागपूर विद्यापीठाची तत्त्वज्ञान आणि राज्यशास्त्र या दोन विषयांतील एमए ही पदवी प्राप्त केली. चंद्रपूरच्या जनता महाविद्यालयात त्यांनी 22 कर्षे राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. त्यानंतर नोकरी सोडून त्यांनी पूर्णवेळ व्यंगचित्र रेखाटन आणि पत्रकारिता केली. सप्रे यांचे पहिले व्यंगचित्र ‘किर्लेस्कर’च्या जून 1957 च्या अंकात प्रसिद्ध झाले. सुरुवातीला नागपूरच्या ‘उद्यम’ मासिकासाठी, 1962 पासून 1984 पर्यंतच्या 22 कर्षांच्या कालाकधीत दररोज मुंबईतील दैनिकासाठी ‘पॉकेट कार्टून्स’; नंतर नागपूर, पुण्यातील वतर्मानपत्रांसाठीही त्यांनी व्यंगचित्रे रेखाटली. लोकसत्ता, लोकमत, केसरी, तरुण भारत वर्तमानपत्रांतून त्यांची व्यंगचित्रे प्रसिद्ध व्हायची.

सांजी, मनोहारी, दहिकर, हसा की, क्यंग किनोद, क्यंगार्थी, रुद्राक्षी, अलस-कलस आदी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. पत्रकारिता, साहित्य, कनसंकर्धन क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठत पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.