विक्रोळीतील वंचितचे शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत

विक्रोळी विधानसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीचे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार सुनील राऊत यांचा झंझावाती प्रचार सुरू आहे. सुनील राऊत यांना सर्व स्तरातून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. विक्रोळीतील वंचितच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबा दिला. तसेच अमन माघाडे, सिद्धार्थ सकपाळ, रवी रेडी, सरस्वती सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना उपनेते दत्ता दळवी, विभाग संघटक रेडकर, उपविभाग प्रमुख शेखर जाधव, राहुल चौहान यांच्यासह शिवसैनिक आणि वंचितचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.