उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये नोकऱ्यांची बोंबाबोंब, भाजपशासित राज्यात बेरोजगारी वाढली

केंद्रात मोदी सरकार आल्यापासून देशभरात बेरोजगार तरुणांची संख्या भरमसाट वाढली आहे. भाजपशासित राज्य उत्तर प्रदेश, गुजरात, हरयाणा, बिहार या राज्यात सर्वात जास्त बिकट परिस्थिती आहे, अशी माहिती आता समोर आली आहे. एखाद्या राज्यात भरती निघाल्यानंतर एका पदासाठी हजारो अर्ज येत आहेत. यामध्ये एमए, पीएचडी झालेले तरुण लिपिक आणि शिपाई पदासाठी अर्ज करताना दिसत आहेत. नोकरी करणाऱयांपैकी 78 टक्के लोक दरमहा 14 हजार रुपयेसुद्धा कमवत नाहीत, तर कमवणाऱयांमध्ये 58 टक्के वाटा हा स्वयंरोजगार असणाऱयांचा आहे. त्यांची सरासरी मासिक कमाई 13,279 रुपये आहे. 22 टक्के कर्मचाऱयांचे सरासरी मासिक उत्पन्न 20 हजार 702 रुपये आहे.

– उत्तर प्रदेशात 2024 च्या पोलीस भरतीत 60 हजार पदांसाठी 50 लाख अर्ज आले.
– बिहारमध्ये जुलै 2023 मध्ये बिहार स्टाफ सिलेक्शनच्या 12 हजार 199 पदांसाठी 25 लाख अर्ज आले.
– हरयाणात एसएससी सीईटी 2023 मध्ये 13 हजार 536 पदांसाठी 13 लाख 75 हजार 151 अर्ज आले.
– गुजरातमध्ये डिसेंबर 2023 मध्ये सब ऑर्डिनेट सर्विस सिलेक्शन बोर्डाच्या अडीच हजार तांत्रिक पदांसाठी 1 लाखांहून जास्त अर्ज आले.

राज्य व बेरोजगारी दर
केरळ 7.2
पंजाब 5.5
राजस्थान 4.2
तामीळनाडू 3.5
हरयाणा 3.4
महाराष्ट्र 3.3
उत्तर प्रदेश 3.1
बिहार 3.0
कर्नाटक 2.7
गुजरात 1.1