पदवी अभ्यासक्रमानंतर आता विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) पीजी अभ्यासक्रम (मास्टर्स) बदलण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार विद्यार्थी मास्टर्स करण्यासाठी आपल्या आवडीच्या कोर्सेसची निवड करू शकतात. पीजी अभ्यासक्रमांसाठी यूजीसीने नवे फ्रेमवर्क तयार केले असून यानुसार पीजी विद्यार्थी काही अडचणी असल्यास अभ्यासक्रम अर्धवट सोडू शकतात. विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची इच्छा असल्यास ते पुन्हा प्रवेश घेऊदेखील शकतात.
यूजीसीच्या नव्या बदललेल्या नियमांनुसार, ज्यांनी तीन वर्षांचे ग्रॅज्युएशन केले आहे ते दोन वर्षांचा पीजी प्रोग्राम निवडू शकतात. ज्यामध्ये तुम्ही दुसऱया वर्षात संशोधनावर पूर्णपणे लक्ष पेंद्रित करू शकता. त्याच वेळी जर विद्यार्थ्यांनी चार वर्षे ऑनर्स किंवा ऑनर्स संशोधनासह केले असेल तर त्यांच्यासाठी एक वर्षाचा पीजी प्रोग्राम असेल. नवीन अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे अभ्यासक्रम निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात येणार आहे.
देशातील उच्च शिक्षण संस्थांकडे एक वर्ष किंवा दोन वर्षे तसेच पाच वर्षीय अभ्यासक्रमांसह विविध पीजी अभ्यासक्रम तयार करण्याची सुविधा आहे. अशा शिक्षणसंस्था विद्यार्थ्यांना एआय आणि मशीन लार्ंनगसारख्या उदयोन्मुख क्षेत्रात काम करण्याची संधी देतील. त्याचबरोबर मास्टरच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या एका शाखेतून दुसऱया शाखेत जाण्याची लवचिकता असेल. दोन शाखांमध्ये पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दोन शाखांपैकी कोणत्याही एका शाखेतील विषय निवडीचे स्वातंत्र्य असेल.
– ज्या विद्यार्थ्यांनी तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम केला आहे ते दोन वर्षांचा पीजी अभ्यासक्रम (मास्टर्स) निवडू शकतात. यातील दुसरे वर्ष संशोधनावर आधारित असेल. विद्यार्थ्यांनी जर चार वर्षे ऑनर्स किंवा ऑनर्स संशोधनासह पूर्ण केले असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी पीजी अभ्यासक्रम हा केवळ एक वर्षाचा असेल.