उद्धव ठाकरे सात मार्च रोजी लातूर जिल्ह्यात

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दिनांक 7 मार्च रोजी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. धाराशिव लोकसभा मतदारसंघातील औसा विधानसभा मतदारसंघापासून त्यांचा धाराशिव लोकसभा मतदारसंघातील दौऱ्याची सुरुवात होणार आहे.

उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांमध्ये जनसंवाद यात्रा करत आहेत. त्या अनुषंगाने धाराशिव लोकसभा मतदारसंघातील जनसंवाद यात्रा लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघापासून सुरुवात केली जाणार आहे. दिनांक सात मार्च रोजी दुपारी बारा वाजता संभाजीनगर येथून लातूर विमानतळावर त्यांचे आगमन होणार आहे. दुपारी साडेबारा वाजता औसा येथे विजय मंगल कार्यालयात सभा घेण्यात येणार आहे या सभेनंतर औसा विधानसभा मतदारसंघातील लामजना किल्लारी कासार सहपुढे ते उमरगा विधानसभा मतदारसंघातील नारंगवाडी पाटी, नाईचाकूर , मुळज मार्गे उमरगा जाणार आहेत.

दिनांक क 07 मार्च रोजी सायं. 4 वाजता उमरगा येथे कै. शिवाजी दादा मोरे क्रीडा संकुल, छत्रपती शिवाजी कॉलेज येथे सभा होणार आहे. यानंतर तुळजापूर येथे संध्याकाळी 7 वाजता डॉ आंबेडकर चौक, तुळजापुर येथे सभा होणार आहे त्यानंतर तुळजापुरची सभा संपल्यानंतर पुष्पक मंगल पार्क, धाराशिव येथे मुक्काम राहणार आहेत. धाराशिव लोकसभा मतदार सघाचे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर पावसाचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख दिनकर माने जिल्हा समन्वयक पप्पू भाई कुलकर्णी यांच्यासह सर्व पदाधिकारी शिवसैनिक या जाहीर समाजासाठी परिश्रम घेत आहेत.