उद्धव ठाकरे यांचा धाराशीव मतदारसंघात जनसंवाद

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवस धाराशीव लोकसभा मतदारसंघाच्या दौऱयावर येत असून जनसंवाद सभांच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या दौऱयाच्या निमित्ताने धाराशीवमध्ये भगवे चैतन्य पसरले आहे.

उद्धव ठाकरे यांचे उद्या दुपारी 12 वाजता लातूर विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर लातूरमधील औसा तालुक्यातील बुधोडा येथे दुपारी 12.30 वाजता विजय मंगल कार्यालयात जनसंवाद सभा होणार आहे. लामजना, किल्लारी, नारंगवाडी, नाईचाकूर, कासारशिरसी मार्गे ते उमरगा येथे जाणार आहेत. उमरगा येथे सायंकाळी 5 वाजता सभा असून त्यानंतर रात्री 8.30 वाजता तुळजापूर येथे सभा होणार आहे. धाराशीव येथे उद्धव ठाकरे यांचा मुक्काम असून 8 मार्च रोजी सकाळी 12 वाजता कळंब येथे, तर दुपारी 4 वाजता भूम येथे त्यांची सभा होणार आहे.

आज
औसा, उमरगा, तुळजापूर
उद्या
कळंब, भूम