विमानांची टक्कर टळली

शिकागो येथील मिडवे विमानतळावर दोन विमानांची टक्कर टळली. वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टाळता आली. साऊथ वेस्ट एअरलाइन्सचे विमान विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करण्यात असताना दुसरे विमान चॅलेंजर 350 खासगी जेट धावपट्टीवर आले. यावेळी साऊथ वेस्ट एअरलाइन्सचे विमान जमिनीपासून केवळ 50 फूट अंतरावर होते, परंतु अचानक ते वर जाऊ लागले. त्यानंतर विमान शिकागो विमानतळावर चॅलेंजर विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले.