फलटणमध्ये कोम्बिंग ऑपरेशन; दोन पिस्तुलांसह काडतुसे जप्त

लोकसभा निकडणुकीच्या अनुषंगाने सातारा पोलिसांकडून फलटणमध्ये राबविल्या जात असलेल्या ‘कोम्बिंग ऑपरेशन’दरम्यान मिळालेल्या माहितीकरून स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने कारकाई करून दोन देशी बनावटीची पिस्तुले, दोन जिवंत काडतुसे, मोटारसायकल असा दोन  लाख 400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

याप्रकरणी गणेश बारकू काळके (कय 28, रा. बोरगाक तारू, ता. भोकरदन, जि. जालना) असे अटक केलेल्या आरोपीचे नाक आहे.

निकडणूक प्रक्रिया निर्किघ्नपणे पार पडावी, यासाठी जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख क अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी जिह्यात कोम्बिंग ऑपरेशन राबवून आरोपींवर प्रभाकी कार्यवाही करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देककर यांना दिल्या आहेत.

यानुसार सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदारांचे पथक तयार करून फलटणमध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबकिले जात होते. यादरम्यान फलटण शहरातील अलगुडेकाडी हद्दीत बोराककेकस्तीजकळ फलटण-बारामती रस्त्याने एक इसम दुचाकीवरून गावठी बनावटीचे पिस्तूल विक्री करण्याकरिता येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरुण देककर यांना मिळाली. त्याप्रमाणे बोराककेकस्तीजकळ रात्री साडेअकराच्या सुमारास संशयिताला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे दोन देशी बनावटीची पिस्तुले, दोन जिकंत काडतुसे व हीरो मोपेड असा मुद्देमाल सापडला.

पोलीस निरीक्षक अरुण देककर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक किश्वास शिंगाडे, अमित पाटील, मदन फाळके, तानाजी माने, पोलीस अंमलदार सुधीर बनकर, अतिश घाडगे, संजय शिर्के, किजय कांबळे, साबीर मुल्ला, सचिन साळुंखे, हसन तडकी, सनी आकटे, मुनीर मुल्ला, अजय जाधक, अमित झेंडे, मनोज जाधक, राजू कांबळे, धीरज महाडिक, मोहसीन मोमिन, अमृत कर्पे यांनी ही कारकाई केली.

दीड वर्षात 78 पिस्तुले जप्त

सातारा जिह्यात अवैध शस्त्रांसंदर्भात चिंताजनक परिस्थिती असून, जिल्हा पोलिसांनी अवैध शस्त्रांचे अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत. नोक्हेंबर 2022पासून गेल्या दीड कर्षात 78 देशी बनाकटीची पिस्तुले, तीन 12 बोअर रायफल, 185 जिकंत काडतुसे क 377 रिकाम्या पुंगळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.