जम्मू-काश्मीरमध्ये वाहन दरीत कोसळले, दोन ठार; तीन गंभीर जखमी

जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात लोड वाहक खोल दरीत कोसळल्याने दोन जण ठार झाले आणि तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी मध्यरात्री पहाडी गंडोह भागातील बट्टारा गावाजवळ हा अपघात झाला. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. शकील अहमद (20) आणि मोहम्मद सायम (18) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.