दोन कोटी भक्तांनी घेतले रामलल्लाचे दर्शन

अयोध्येमधील श्रीराम जन्मभूमी मंदिरात 22 जानेवारी रोजी झालेल्या प्राणप्रतिष्ठेनंतर 14 जुलैपर्यंत जवळपास दोन कोटी श्रीरामभक्तांनी रामलल्लाचे दर्शन घेतले आहे. दररोज सुमारे 1.12 लाख भाविक प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी येत आहेत. महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळावर 5 लाख 20 हजार प्रवासी आले. रोज सुमारे अडीच हजार विमान प्रवाशांची रहदारी होत आहे, अशी माहिती ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांनी दिली. 70 एकरांत स्थापन मुख्य श्रीराम जन्मभूमी मंदिराचा पहिला व दुसरा मजला, मुख्य शिखरासह सर्व पाच शिखरे, राम दरबारचे काम डिसेंबरपर्यंत होईल. मंदिर बांधकामावरील एपूण अंदाजित खर्च सुमारे 1600 कोटी आहे. मुख्य मंदिरासोबत सप्त मंदिराचे काम होत आहे व मार्च 2025 पर्यंत पूर्ण होईल, असेही ते म्हणाले. 500 लोकांच्या क्षमतेचे ऑडिटोरियम तयार केले जात आहे.