अजब बायोडेटामुळे नोकऱ्यांचा पाऊस!

नोकरीसाठी इच्छुक असणारे लोक अत्यंत काळजीपूर्वक आपल्या अनुभवांच्या आधारे बायोडेटा किंवा रिझ्युम लिहितात. परंतु एक अजब बायोडेटा चर्चेत आला आहे. गुगलचा माजी कर्मचारी जेरी ली याचा हा बायोडेटा आहे. जेरीने बायोडेटात स्वतःची माहिती लिहिताना आपण मिया खलिफा एक्स्पर्ट असल्याचे सांगितलेय. तसेच एका रात्रीत जास्तीत जास्त वोडका शॉर्टस प्यायचा अनुभव असल्याचे लिहिलेय. अशा अनेक विचित्र गोष्टी जेरीने बायोडेटामध्ये नमूद केल्या आहेत.

नोकऱ्या देणाऱ्या कंपन्यांची एचआर टीम बायोडेटा बारकाईने वाचतात का, हे पाहण्यासाठी गुगलचा माजी कर्मचारी जेरीने हा प्रताप केला. मात्र झाले उलटेच जेरीचा विचित्र बायोडेटा पाहून त्याला जगभरातील तब्बल 29 कंपन्या नोकरी द्यायला उत्सुक झाल्या आहेत.