सरकारची माघार, ‘हिट अ‍ॅण्ड रन’ कायद्याला तुर्तास स्थगिती; मालवाहतूकदारांचा संप मागे

केंद्र सरकारने हिट अँन्ड रन कायद्यात केलेल्या बदलांविरोधात संपूर्ण देशभरातील ट्रक चालकांचे दोन दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू आहे. ट्रकचालकांनी अनेक ठिकाणी चक्काजाम देखील केला. याचा मोठा परिणाम सामान्यांच्या जनजीवनावर होऊ लागला. भाज्या महागल्या, पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी होऊ लागली. अखेर केंद्र सरकारने माघार घेत मोटर वाहन कायद्यातील नवीन तरतुदींना स्थगिती दिली आहे. केंद्रीय गृह सचिव व ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे शिष्टमंडळ यांच्यात झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर मालवाहतूकदारांनी त्यांचा संप मागे घेतला आहे.