पश्चिम रेल्वेवर सहाव्या मार्गिकेमुळे वाहतूक धिम्या गतीने; वेगमर्यादेने गती मंदावली

पश्चिम रेल्वे मार्गावर गोरेगाव ते कांदिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे मालाड स्थानकात प्रवाशांना चढण्याउतरण्यासाठी फलाटांच्या दिशेत बदल करण्यात आले आहे. कांदिवली ते गोरेगाव दरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामावर लोकलच्या वेगावर मर्यादा आली आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक मंदावली आहे. सोमवारी लोकल गाड्या 10 ते 15 मिनिटे विलंबाने धावत होत्या.

पश्चिम रेल्वे मार्गावर कांदिवली ते गोरेगावदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम सुरू आहे. आता मालाड स्थानकात सहाव्या मार्गिकेची जोडणी करण्यात आली आहे. त्यामुळे या स्थानकात फलाटांच्या दिशेत बदल झाले आहेत. तसेच गोरेगाव ते कांदिवलीदरम्यान लोकलच्या वेगावर मर्यादा लावण्यात आली आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील वाहतूक विलंबाने सुरू आहे. सहाव्या मार्गिकेचे काम सुरू असल्याने आणखी आठवडाभर गाड्या विलंबाने धावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोमवारी सकाळी पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक 10 ते 15 मिनिटे विलंबाने सुरू होती. या कामाबाबतची माहिती रेल्वेकडून प्रवाशांना देण्यात आली होती.