‘लाडू’ वादानंतर तिरुपती मंदिराचे शुद्धीकरण! महाशांती होम, स्वयंपाकघर गोमूत्राने धुतले

तिरुपती मंदिरातील लाडू वादानंतर सोमवारी मंदिराचे शुद्धीकरण करण्यात आले. मंदिरात प्रदीर्घ महाशांती होम करण्यात आला तसेच स्वयंपाकघर गोमूत्राने धुऊन काढण्यात आले. दरम्यान, तिरुपतीच्या प्रसादातील लाडूत  असलेल्या चरबीची आता एसआयटी चौकशी करण्यात येणार आहे.

जगनमोहन रेड्डी मुख्यमंत्री असताना तिरुपती मंदिरात वाटप करण्यात येणारे लाडू बनवताना प्राण्यांची चरबी वापरण्यात आल्याचा आरोप विद्यमान मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला होता.

z तूप भेसळ प्रकरणी होत असलेल्या आरोपांची कोर्टाच्या देखरेखीखाली समिती नेमून चौकशी करावी यासाठी तिरुमला बोर्डाचे माजी अध्यक्ष आणि  खासदार वाय.व्ही. रेड्डी यांनी सुप्रीम कोर्टात पीआयएल दाखल केली आहे. तपासणी केलेले तूप कुठून आणले होते याचाही पह्रेन्सिक अहवाल सादर करावा, असे याचिकेत म्हटले आहे.