जम्मू कश्मीरमध्ये चकमकीत तीन दहशतवादी ठार, आठवड्याभरात नऊ दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू कश्मीरमधील श्रीनगर जिल्ह्यातील पांथा तौकात गुरुवारी रात्री सुरू झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या चकमकीत चार जवान जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्याने घटनास्थलावरून पोलिसांनी शस्त्रसाठा जप्त केला आहे.

पांथा चौकातील एका घरात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे जम्मू कश्मीर पोलीस व सीआरपीएफच्या जवानांनी शोध मोहिम सुरू केली होती. या शोधमोहिमेदरम्यान झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. त्यातील एकाची ओळख पटली आहे. सुहैल अहमद असे त्या दहशतवाद्याचे नाव असून तो जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा दहशतवादी आहे.

गेल्या आठवड्याभरात जम्मू कश्मीरमध्ये जवानांनी नऊ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. कुलगाम व अनंतनाग या जिल्ह्यात या चकमकी झाल्या असून यात एक जवान शहीद झाला होता