वाडय़ाच्या नेहरोली येथील त्या तिघांची हत्याच

वाड्याजवळील नेहरोली गावात घरात सापडलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे. वाडा तालुक्यातील नेहरोली गावात मुपुंद राठोड , पंचन राठोड आणि त्यांची मुलगी संगीता राठोड हे राहत होते. त्यांचे मृतदेह घरात सापडले. पंचन आणि संगीता यांचे मृतदेह एका पेटीत बंद करून ठेवण्यात आले होते तर मुपुंद यांचा मृतदेह बाथरूममध्ये आढळून आला. त्यांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होते. या तिघांनीही आत्महत्या केली असावी अशी प्राथमिक शंका व्यक्त करण्यात आली. पोलिसांनी गोळा केलेल्या माहितीवरून ही हत्याच असावी निष्पन्न झाल्याचे वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे यांनी सांगितले.माहितीवरून ही हत्याच असावी निष्पन्न झाल्याचे वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे यांनी सांगितले.