व्यापाऱ्याकडे खंडणी मागणाऱ्या तिघांना अटक, गोरेगाव येथील खोलीत ठेवले डांबून  

घरफोड्या करून पळून गेलेल्या चोरट्याला अखेर वर्षानंतर अंधेरी पोलिसांनी  बेड्या ठोकल्या. उबेद हैदरअली खान असे त्याचे नाव आहे. त्याच्या अटकेने दोन गुह्याची उकल करण्यात अंधेरी पोलिसांना यश आले.

तक्रारदार या अंधेरी परिसरात राहतात. गेल्या वर्षी तक्रारदार आणि त्याच्या शेजारी राहणाऱ्या दोघांच्या घराचे कडी-कोयंडा तोडून चोरट्याने 8 लाखांचा ऐवज घेऊन पळ काढला होता. या प्रकरणी अंधेरी पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता. वरिष्ठ अधिकाऱयांच्या सूचनेनंतर तपासासाठी पोलिसांची दोन पथके तयार केली होती. पथकाने सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. फुटेजची तपासणी केल्यावर तो चोरटा हैदर असल्याचे समोर आले. गुन्हा घडल्यानंतर तो रेल्वेने बिहारच्या दरभंगा येथे जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याला एक्सप्रेसमध्ये पकडण्याचा प्रयत्न केला असता तो पळून गेला होता. उबेद हा उत्तर प्रदेशच्या शहाजानपूर येथे असल्याची माहिती पोलिसांना  तेथे पोलिसांनी तीन दिवस फिल्डिंग लावली. फिल्डिंग लावून पोलिसांनी उबेदच्या मुसक्या आवळल्या.