अमेरिकेत ‘ओम शांती शांती’चे सूर

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. डेमोक्रेटिक पार्टीच्या कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पार्टीचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यात लढत होणार आहे. सध्या शिकागो येथे डेमोक्रेटिक पार्टीचे राष्ट्रीय अधिवेशन सुरू आहे. तिसऱ्या दिवसाची दिवसाची सुरुवात एका हिंदू पुजारींच्या भाषणाने झाली आणि सभागृहात ‘ओम शांती शांती’चे सूर गुंजले. यावेळी मेरिलँडच्या मंदिराचे पुजारी राकेश भट यांनी अमेरिकेच्या ऐक्यासाठी  वैदिक प्रार्थना केली. राकेश भट मेरिलँड येथील शिव विष्णू मंदिराचे पुजारी आहेत. ते मूळचे बंगळुरू येथील असून अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. त्यांनी s संस्कृत, इंग्रजी आणि कन्नड भाषेतील मास्टर डिग्री प्राप्त केलेली आहे. आपल्यात मतभेद असले तरी जेव्हा राष्ट्राचा विषय येतो तेव्हा आपण सारे एक असायला पाहिजे, असे राकेश भट्ट आपल्या भाषणात म्हणाले.