लालबागमध्ये दुचाकीची चोरी

लालबाग परिसरात होत असलेल्या गर्दीचा गैरफायदा उचलत चोरांनी पार्क केलेल्या दोन दुचाकी चोरल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

अंधेरी येथे राहणारा अतिष शिंदे (25) हा तरुण नातेवाईकांसह दुचाकीवरून लालबाग येथे बाप्पाच्या दर्शनासाठी आला होता. त्याने भारतमाता पासून काही अंतरावर दुचाकी पार्क करून दर्शनासाठी गेला होता. तो पहाटे दर्शन घेऊन परतला असता त्याची दुचाकी गायब असल्याचे आढळून आले. दरम्यान, लोअर परळ येथे राहणारा विघ्नेश मेका (23) या तरुणाने रॉयल इन्फील्ड बुलेट लालबाग परिसरात पार्क केली होती. ती दुचाकी दुखील चोरीला गेल्याची घटना घडली.