लांजात आढळला महाराष्ट्राचा राज्यप्राणी ‘शेकरू’!

वन पर्यावरण आणि प्राणीप्रेमींसाठी सुखद बातमी आहे. तालुक्यातील भांबेड येथील मुंबईस्थित नवल शेवाळे यांच्या बागेत महाराष्ट्र राज्य पशू शेकरू हा अत्यंत दुर्मिळ प्राण्याचे दर्शन झाले आहे. या शेकरू (उडती खार) या दुर्मिळ प्राण्याचा झाडांवर बागडतानाचे दृश्य नवल शेवाळे यांनी टिपले आहे. लांजा वनपाल दिलीप आरेकर यांनी चित्रित केलेल्या चित्रफितीत दिसणारा प्राणी शेकरू असल्याचे सांगितले. शेकरू हा महाराष्ट्र राज्याचा राज्य पशू आहे. उडती खार ही खारीची प्रजात आहे.

हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. शेकरू (उडती खार; शास्त्राrय नाव ः Ratufa indica, रॅटुफा इंडिका ; इंग्लिशः Indian giant squirrel, इंडियन जायंट स्क्विरल) ही खारींची एक प्रजाती आहे. शेकरू महाराष्ट्र राज्याचा राज्य पशू आहे. शेकरू हा पशू भीमाशंकर या भागात जास्त प्रमाणात आढळतो. भांबेड येथील नवल शेवाळे हे मुंबईत नोकरीनिमित्त स्थायिक आहेत. भांबेड येथे त्यांनी काजू आणि आंब्याची बाग जोपासली आहे. लांजातील पूर्व भागात खोरनिणको, प्रभान वल्ली, भांबेड या गावात जंगल वनसंपदा मोठय़ा प्रमाणात आहे. पूर्वी आंबा घाटात जंगल परिसरात शेकरू हा प्राणी आढळत असे. भीमाशंकर पर्वत भागात शेकरूचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात आहे, परंतु हळूहळू हा प्राणी प्रजनन कमी होत गेले आहे.

थोडे शेकरूविषयी
शेकरू म्हणजे झाडावर राहणारी मोठी खारूताई. हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे. सदाहरित, निम सदाहरित व नदीकाठच्या जंगलात आढळतो. शेकरूचे घरटे आढळतात. रान आंबा, आंबाडा, किंजळ, रान बिब्बा, हिरडा, नाना, बेहडा, फणस, चांदाडा, उंबर आदी झाडांवर शेकरूला राहायला आवडते. याच फळांचे अन्न म्हणून उपयोग करते. उंच झाडावर शेकरू घर बांधते. झाडाच्या काटक्या मऊ पान यांचा उपयोग करून घुमटाकार आकाराचे घर बांधतो. शेकरूचे जीवनचक्र साधारण 15 वर्षे आहे. शेकरूची मादी तीन वर्षांत व नर पाच वर्षांत वयात येतो. शेकरू एका वेळेस 1 ते 2 पिल्लांना जन्म देते. शेकरू फक्त दिवसा सक्रिय असतो. पुन्हा सूर्यास्तापर्यंत खाद्य खाऊन अंधारापूर्वी घरटय़ात परततो.

मी दोन दिवसांपूर्वी मुंबईहून भांबेडला आलो होतो. बागेत गेल्यानंतर मला एक वेगळा प्राणी एका झाडावर दुसऱया झाडावर उडय़ा मारत असल्याचे पाहिले. सुरुवातीला माकडासारखा असणारा प्राणी वाटल्याने त्याला पॅमेऱयात पैद केले. नंतर ते पह्टो पाहून भांबेड गावचे सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण हेगिष्टे यांनी वनाधिकारी यांना खात्री करण्यास सांगितले. वन अधिकाऱयांनी हा प्राणी शेकरू असल्याचे सांगितले.
– नवल शेवाळे