हिंदुस्थानात 20 कोटी मुलींचा बालविवाह

हिंदुस्थानात तब्बल 20 कोटींहून अधिक महिलांचा बालविवाह झाल्याची धक्कादायक माहिती संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या अहवालातून उघड झाली आहे. जगभरात 6.4 कोटी तरुणींचे त्या 18 वर्षांच्या होण्याआधीच लग्न केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी एक तृतीयांश तरुणी हिंदुस्थानातील असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात म्हटले आहे. ‘सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स रिपोर्ट 2024’ नुसार प्रत्येक पाच मुलींपैकी एका मुलीचे 18 वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच लग्न होते, तर 25 वर्षांपूर्वी लग्न करणाऱयांची संख्या चारपैकी एक आहे. बालविवाह रोखण्यासाठी अनेक सुधारणा करण्यात आल्या असून गेल्या काही वर्षांत 68 कोटी बालविवाह रोखण्यात आले आहेत. इतक्या प्रगतीनंतरही लिंग समानतेत जग मागे पडल्याची खंत संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली असून महिलांवरील अत्याचाराची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. सध्याची परिस्थिती पाहता स्त्राr-पुरुष समानता आणण्यासाठी 176 वर्षे लागतील, असेही अहवालात म्हटले आहे.