मुंबईत रंगणार ‘मिस वर्ल्‍डची’ ग्रॅण्‍ड फिनाले

9 मार्च रोजी जिओ वर्ल्‍ड कन्‍वेंशन सेंटरमध्ये होणार आयोजन

71व्या मिस वर्ल्‍ड सोहळ्याच्या ग्रॅण्‍ड फिनालेचे आयोजन 9 मार्च रोजी मुंबईतील जिओ वर्ल्‍ड कन्‍वेंशन सेंटर येथे भव्‍य सोहळ्यासह करण्‍यात येणार आहे, अशी घोषणा आज मिस वर्ल्‍ड ऑर्गनायझेशनने अधिकृतरित्‍या केली. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण जगभरात करण्यात येणार आहे. 18 फेब्रवारी ते 9 मार्च 2024 दरम्‍यान या सोहळ्याचे आयोजन देशभरातील विविध ठिकाणी करण्यात येणार आहे.

जगभरातील देशांमधील 120 महिला स्‍पर्धक विविध स्‍पर्धा आणि चॅरिटेबल उपक्रमांमध्‍ये सहभाग घेतील, तसेच त्‍या परिवर्तनाच्‍या अॅम्‍बेसेडर्स देखील बनतील. आज नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या प्री-लाँच परिषदेमध्‍ये माजी मिस वर्ल्ड विजेत्या कुमारी टोनी ॲन सिंग, कुमारी व्हेनेसा पोन्स डी लिऑन, कुमारी मानुषी छिल्लर आणि कुमारी स्टेफनी डेल व्हॅले यांच्यासह सध्याची मिस वर्ल्ड कुमारी कॅरोलिना बिएलॉस्का पहिल्यांदाच ग्रॅण्‍ड फिनालेसाठी मंचावर एकत्र आल्‍या.

71वा मिस वर्ल्‍ड सोहळ्याला 20 फेब्रुवारी रोजी नवी दिल्‍लीमधील आलिशान हॉटेल द अशोक येथे ‘उद्घाटन समारोह’ आणि इंडिया टुरिझम डेव्‍हलमेंट कॉर्पोरेशन (आयटीडीसी) चा ‘इंडिया वेलकम्‍स द वर्ल्‍ड गाला’सह सुरूवात होईल.

भारतातील 71वा मिस वर्ल्ड फेस्टिवलचे भव्‍य सेलिब्रेशन उल्‍लेखनीय क्षण आहे, कारण हा सोहळा 28 वर्षांनंतर देशात परतला आहे. कुमारी ऐश्वर्या राय, कुमारी प्रियांका चोप्रा आणि कुमारी मानुषी छिल्लर यांसारख्या उल्लेखनीय व्यक्तींसह असंख्य मिस वर्ल्ड विजेत्यांचा समृद्ध वारसा भारताला लाभला आहे. या यशांमुळे जागतिक स्तरावर भारताचा दर्जा लक्षणीयरित्या उंचावला आहे. 1951 मध्ये सुरू झालेली मिस वर्ल्ड स्पर्धा पारंपारिक सौंदर्य स्पर्धांच्या पलीकडे जात परोपकार आणि सेवेद्वारे महिलांना सक्षम करण्‍यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या नवीन तत्त्वांचा अवलंब करते.