सोने तस्करी करणाऱया तिघीना अटक

सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर विभागाने सोने तस्करीप्रकरणी तिघींना अटक केली. रुबिना बानो खाजा शेख आणि मेरी जेणे मेला, मैला ओरडोनेझ अशी त्या तिघींची नावे आहेत. त्याच्याकडून दोन कोटी रुपयांचे सोने जप्त केले. त्या तिघींना अटक करून न्यायालयात हजर केले होते.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर काम करणारी रुबिना शेख ही सोने तस्करी करणार असल्याची माहिती हवाई गुप्तचर विभागाला मिळाली. त्या माहितीनंतर हवाई गुप्तचर विभागाने रुबिनाला ताब्यात घेतले. तिची कसून चौकशी केली. नुकत्याच मेरी आणि मैला या दोघी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आल्या. त्यानंतर त्या दोघी विमानतळावरील कर्मचाऱयांसाठी असलेल्या शौचालयात गेल्या. शौचालयात गेल्यावर तेथे मेरी आणि मैलाने रुबिनाला भेटली. सोन्याची पेस्ट असलेले पाऊच विमानतळावर बाहेर नेण्यास मदत कर, त्याच्या मोबदल्यात 20 हजार रुपये देऊ असे आमिष दिले. पैशाच्या आमिषाला रुबिना बळी पडली. त्याने पेस्ट स्वरूपात असलेले सोन्याचे पाकीट रुबिनाला दिले. रुबिनाने ते पाऊच अंतर्वस्त्रात लपवले होते. हवाई गुप्तचर विभागाने त्या पाऊचमधून सोने जप्त केले. जप्त केलेल्या सोन्याची किंमत सुमारे दोन कोटी रुपये इतकी आहे. त्यानंतर हवाई गुप्तचर विभागाने मेरीची चौकशी केली. तिलादेखील सोने तस्करीच्या मोबदल्यात रक्कम मिळणार होती. सोने तस्करीप्रकरणी मैला या महिलेची चौकशी केली. सीमा शुल्क कायद्यानुसार त्या तिघींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.