कर्नाटक-गोव्याला जोडणारा पूल कोसळला

सरकारच्या दुर्लक्षामुळे आणि निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे बिहारमध्ये पूल कोसळण्याची मालिका सुरू आहे. त्यात आता कर्नाटकातील कारवार आणि गोव्याला जोडणाऱ्या 40 वर्षे जुन्या पुलाची भर पडली आहे. या पुलाकडे सरकारने सातत्याने दुर्लक्ष केले. पुलाची डागडुजी करण्यात आली नाही. त्यामुळे हा पूल मध्यरात्रीच्या सुमारास कोसळला.

या पुलाच्या बाजूलाच नवा पूल उभारण्यात आला असून या पुलाच्या सुरक्षेची समीक्षा करण्यात येणार आहे. जुना पूल खिळखिळा होऊनही त्या पुलावरून वाहतूक सुरू होती. या घटनेत आणखी एकजण जखमी झाला आहे.  काळी नदीवरील हा पूल बुधवारी मध्यरात्री दीड ते दोनच्या दरम्यान कोसळला. यावेळी एक ट्रक नदीत कोसळून वाहून गेला. या घटनेत ट्रकचालक मात्र बचावला.