Akshay Shinde Encounter – व्हॅनमध्ये एन्काऊंटर वेळी काय-काय घडलं? ठाणे पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितलं

अक्षय शिंदे याच्या पत्नीने गुन्हा दाखल केला होता. त्यासाठी चौकशी करण्यासाठी त्याला नेण्यात आले असता त्याने पोलिसांची बंदूक घेऊन फायर केले. त्यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षण म्हणून त्याचा एन्काऊंटर करण्यात आला.मुंब्रा देवी मंदिराच्या पायथ्याशी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आला. यात एक पोलीस अधिकारी जखमी आहे. जखमी पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्यावर जुपिटर रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. आता दोन्ही तपास ठाणे पोलीस करणार आहेत.

तळोजा कारागृहातून दुसऱ्या गुन्हाची चौकशीसाठी अक्षय शिंदे याला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, त्याला बदलापूर येथे घेऊन जाताना मुंब्रा बायपास येथील मुंब्रा देवीच्या पायथ्याशी त्याचा एन्काऊंटर करण्यात आला असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली. एन्काऊंटर प्रकरणी मयत अक्षय शिंदे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अक्षय शिंदेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला गेला आहे. मुंब्रा पोलिसांकडून गुन्हा दाखल केला गेला. मुंब्रा बायपास रोडवर पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवरती तीन गोळ्या झाडल्याचा अक्षय शिंदेवर आरोप आहे. अक्षय शिंदेच्या गोळीबारात सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे जखमी झाले होते.

ठाणे पोलिसांनी घेतला एन्काऊंटर घटनेचा आढावा

मुंब्रा बायपास येथे ठाणे पोलिसांसह फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे. ज्या ठिकाणी अक्षय शिंदे याने फायरींग केली. आणि त्यानंतर पोलिसांनी त्याचे एन्काऊंटर केले त्या स्पॉटवर पोलिसांचा पंचनामा सुरू आहे.

पोलिसांच्या “त्या” व्हॅनमध्ये नेमके काय झाले?

अक्षय शिंदेवर गोळ्या झाडणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदेंचा जबाब समोर आला आहे. संजय शिंदे हे पोलिसांच्या व्हॅनमध्ये पुढच्या बाजुला बसले होते. अक्षय शिंदे याला ताब्यात घेतल्यानंतर मला जाऊ द्या, असे तो वारंवार म्हणत होता. तसेच शिवीगाळ करत होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्याशी झालेल्या झटापटीत अक्षय शिंदेकडून पिस्तुल लोड होऊन एक गोळी फायर झाली. ज्यात निलेश मोरे जखमी झाले. त्यानंतर अक्षय शिंदेने बंदूक ताब्यात घेतली आणि एकालाही जिवंत सोडणार नाही, असे म्हणत दोन गोळ्या झाडल्या. नशिबाने त्या दोन्ही गोळ्या आम्हाला लागल्या नाहीत, म्हणून आम्ही वाचलो. हे सगळं होण्याआधी अक्षयवर गोळी झाडणारे संजय शिंदे पोलीस व्हॅनमध्ये ड्रायव्हरच्या शेजारी बसले होते. निलेश मोरे आणि आरोपी अक्षय शिंदे यांच्यात वाद होत असताना मोरे यांनी संजय शिंदे यांना फोन केला आणि घडत असलेला प्रकार सांगितला. त्यानंतर संजय शिंदे समोरून उतरून मागच्या पोलीस व्हॅनच्या भागात आले आणि आरोपी अक्षय शिंदेच्या समोर बसले. आरोपी अक्षय शिंदे एपीआय निलेश मोरे आणि कॉन्स्टेबल अभिजीत मोरे यांच्यामध्ये बसला होता. पीआय संजय शिंदे हे आरोपीच्या समोर कॉन्स्टेबल हरीश तावडे यांच्यासमोर बसले होते. आरोपी अक्षय शिंदे अचानक आक्रमक होऊन एपीआय मोरे यांची बंदूक खेचू लागला. त्यावेळी ती फायर झाली ज्यात मोरे जखमी झाले आणि खाली पडले. त्यानंतर अक्षय शिंदे याने पिस्तुलचा ताबा घेतला आणि दोन राउंड फायर केले जे सुदैवाने कोणालाही लागले नाहीत. अक्षय शिंदे आणखी गोळ्या झाडण्याच्या तयारीत असताना संजय शिंदे यानी स्वतःच्या पिस्तुलमधून एक गोळी अक्षय शिंदेवर झाडली. ज्यात अक्षय शिंदे जखमी होऊन खाली पडला

संजय शिंदेचा जबाब