Thane News – पार्टीतील वाद टोकाला गेला, तरुणाने मित्राचा आधी कान चावला, मग गिळला!

ठाण्यात एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. पार्टीत दोन मित्रांमध्ये वाद झाला. हा वाद वाद इतका विकोपाला गेला की एका मित्राने दुसऱ्या मित्राचा कानच चावला. यानंतर तो कान चावून गिळला. ठाण्यातील कासारवडवली परिसरात ही भयंकर घटना घडली. विकास मेनन असे आरोपीचे तर श्रवण लिखा असे पीडिताचे नाव आहे.

कासारवडावलीमधील पाटलीपारा परिसरातील एका हायप्रोफाईल सोसायटीत बुधवारी सकाळी ही घटना घडली. श्रवण लिखा आणि त्याचा मित्र विकास मेनन मित्रांसोबत पार्टी करत होते. यावेळी दोघांमध्ये काही कारणातून वाद झाला. वाद विकोपाला गेला आणि विकासने श्रवणचा कान चावला. तो एवढ्यावरच थांबला नाही. चावलेला कान त्याने चघळून गिळला.

याप्रकरणी श्रवणच्या फिर्यादीनवरून कासारवडवली पोलीस ठाण्यात विकासविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई पोलीस करत आहेत.