शिर्डी संस्थानमधील कर्मचाऱ्यांसाठी तेलगू भाषेचे प्रशिक्षण वर्ग

श्री साईबाबांचे दर्शनासाठी देश विदेशातून मोठया प्रमाणात भाविक येत असतात. त्‍यामध्‍ये दक्षिण भारतातील भक्तांची संख्या जास्त असेत. त्यांना सेवा-सुविधा पुरविण्यासाठी अनेकदा भाषेचा अडसर येतो. अशा भाविकांशी मातृभाषेतून संवाद साधण्यात आल्यास भाषेची अडचण येणार नाही आणि भक्तांनाही आपुलकी वाटेल, या हेतूने संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवले यांनी पुढाकार घेतला आहे.

त्यांच्या सुचनेनुसार सर्व संस्थानच्या कर्मचाऱ्यांना तेलगू भाषेचे प्राथमिक ज्ञान व्हावे यासाठी प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहे. त्याची सुरुवात मंगळवारपासून करण्यात आली. यावेळी संरक्षण विभागातील प्रातिनिधीक काही कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी श्री साईबाबा संस्‍थानच्या प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहीदास माळी आदी उपस्थित होते.