शिक्षकी पेशाला काळीमा! आधी अश्लील बोलणं नंतर व्हिडिओ दाखवून विनयभंग, प्राध्यापक निलंबित

बिहारच्या गोपाळगंजमध्ये एक शिक्षकानेच हैवानासारखे कृत्य केल्याचे समोर आले आहे. कस्तूरबा गांधी आवासीय विद्यालयाचा मुख्याध्यापक विद्यार्थींनींशी अश्लील बोलणे तसेच त्यांना अश्लील व्हिडीओ दाखवण्याचा प्रयत्न करतो. याबाबत विद्यार्थिनींनी घरी सांगितले त्यावेळी घरच्यांना धक्काच बसला. त्यांनी शाळापरिसरात एकच गोंधळ घातला आणि अखेर पोलिसांना बोलावण्यात आले. मुख्याध्याकाच्या कृत्याबाबात शाळा प्रशासनाने निलंबित केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हथुआ येथील कस्तुरबा गांधी शाळेमधील ही घटना आहे. परशुराम साह असं या प्राचार्याचे नाव आहे. ते विद्यार्थिनींशी अश्लील बोलायचे. त्यांना मोबाईल आणि फेसबुकच्या माध्यमातून अश्लील व्हिडिओ दाखवण्यात आले. मुख्याध्यापकांच्या या प्रकारामुळे अनेक विद्यार्थिनींनी शाळेत जाणे बंद केले होते. गेल्या दोन महिन्यांपासून शाळेतील विद्यार्थिनींची संख्या सातत्याने कमी होत होती. याबाबत अनेक पालकांनी एकमेकांकडे चौकशी केली असता शाळेच्या मुख्याध्यापकांच्या वाईट वागणूकीमुळे विद्यार्थिनी शाळेत जाण्यास टाळाटाळ करू लागल्याचे समोर आले.

त्यानंतर पालकांनी कस्तुरबा गांधी निवासी शाळा गाठून गोंधळ घातला. आरोपी मुख्याध्यापकांना हटवण्याची मागणी करू लागले. दरम्यान विद्यार्थी आंघोळ करत असताना प्राचार्य बाथरूममध्ये घुसल्याचे सांगितले आहे. जेव्हा विद्यार्थिनींनी याबाबत तक्रार केली तेव्हा मुख्याध्यापकांनी एका विद्यार्थिनीला बेदम मारहाण केली. विद्यार्थीनी ही बेशुद्ध होऊन पडली होती तिला प्राचार्यानी रुग्णालयात दाखल केले. मात्र कस्तुरबा गांधी निवासी शाळेतील इतर महिला शिक्षिकांनीही हे आरोप योग्य ठरवले आहेत.

पालकांच्या तक्रारीवरून हथुआ झोनचे सीईओ आणि पोलीस या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आले असता शाळेच्या मुख्याध्यापकावरील आरोप खरे असल्याचे सांगितले आले. शिक्षण विभागाने आरोपी प्राचार्य परशुराम साह यांना निलंबित केले आहे.