Ron Ely – ‘टारझन’ फेम हॉलीवूड अभिनेते रॉन एली यांचे निधन, 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

टिव्ही सिरीजमध्ये ‘टारझन’ मध्ये मुख्य भूमिका साकारणाका प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेते रॉन एली यांचे निधन झाले आहे. त्यांनी 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्याची मुलगी कर्स्टन कैसले एलीने बुधवारी इन्टाग्रामवर भावूक पोस्ट शेअर करत वडिलांच्या निधनाची माहिती दिली.

इन्टाग्रामवर फोटो शेअर करत कर्स्टनने सांगितले की, जगाने एक महान व्यक्तीमत्व गमावले आणि मी माझे वडिल गमावले आहेत. माझे वडिल सर्वांसाठी हिरो होते. ते एक अभिनेते, लेखक, प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि नेते होते. 29 सप्टेंबर रोजी त्यांचे कॅलिफोर्निया येथील घरी निधन झाले.

दिवंगत अभिनेते 1960 च्या दशकात एनबीसीच्या ‘टारझन’ मधील मुख्य भूमिकेसाठी प्रसिद्ध झाले. ही टीव्ही मालिका 1966 ते 1968 या काळात प्रसारित झाली. विशेष म्हणजे या शोमधील बहुतांश स्टंट त्यांनी स्वत:च केले आणि यादरम्यान दोन वेळा त्यांच्या खांद्याला दुखापत झाली आणि जखमाही झाल्या. त्यानंतर 1975 मध्ये युनिव्हर्सलच्या डॉक सेवेज: द मॅन ऑफ ब्रॉन्झमध्ये काम केले आणि लोकप्रिय टीव्ही शो वंडर वुमन, द लव्ह बोट, फँटसी आयलंड आणि सुपरबॉयमध्ये कॅमिओ भूमिका केल्या. 1980 च्या दशकात, एली यांनी म्युझिकल गेम शो फेस द म्युझिकचे आयोजन केले आणि 1980 आणि 1981 मध्ये मिस अमेरिका स्पर्धेचे होस्ट म्हणून बर्ट पार्क्सची जागा घेतली.