फोनवर बोलणे महागणार, जिओ आणि एअरटेल कंपनीचा ग्राहकांना दणका

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून महिना उलटण्याआधीच सर्वसामान्यांना जोरदार फटका बसला आहे. देशातील दोन टेलिकॉम कंपन्यांनी मोबाईल टॅरिफ वाढीची घोषणा केली आहे. गुरुवारी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने मोबाईल टॅरिफमध्ये 12 ते 15 टक्के वाढीची घोषणा केली. त्याच्या दुसऱयाच दिवशी म्हणजे शुक्रवारी भारती एअरटेलनेसुद्धा मोबाईल टॅरिफच्या दरात 10 ते 21 टक्के वाढ केली आहे. वाढवलेले टॅरिफ 3 जुलै 2024 पासून लागू होणार आहेत. कंपनीच्या या घोषणेनंतर पोस्टपेड आणि प्रीपेड असे दोन्ही प्लान महाग होणार आहेत. जिओ, एअरटेलनंतर आता वोडाफोन-आयडिया कंपनीसुद्धा प्लान महाग करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. टेलिकॉम कंपन्यांनी नोव्हेंबर 2021 नंतर पहिल्यांदा टॅरिफमध्ये इतकी मोठी वाढ केली आहे. टेलिकॉम कंपन्यांनी 5 जी सर्व्हिससाठी मोठी आर्थिक गुंतवणूक केली आहे. जिओ आणि एअरटेलने 5जी सेवा सुरू करण्यासाठी दोन लाख कोटी रुपयांहून जास्त रुपयांची गुंतवणूक केली आहे.

पोस्टपेड प्लान्स

399 रुपये – 449 रुपये
499 रुपये – 549 रुपये
599 रुपये – 699 रुपये
999 रुपये – 1199 रुपये

व्हाईस प्लान

179 रुपये – 199 रुपये
455 रुपये – 509 रुपये
1799 रुपये – 1999 रुपये

डेली डेटा प्लान्स

265 रुपये – 299 रुपये
299 रुपये – 399 रुपये
359 रुपये – 409 रुपये
399 रुपये – 449 रुपये
479 रुपये – 579 रुपये
549 रुपये – 649 रुपये