T20 World Cup 2024 : रो’हिट’ सेनेचा विजयी श्री गणेशा, आयर्लंडचा केला 8 विकेटने पराभव

अमेरिकेच्या धर्तीवर सुरू झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पहिला सामना आयर्लंडविरूद्ध पार पाडला. या सामन्यात आयर्लंडने दिलेले 97 धावांचे लक्ष टीम इंडियाचा शिलेदारांनी 13 व्या षटकात पूर्ण करत 8 विकेटने विजय संपादित केला.

अमेरिकेच्या Nassau County International क्रिकेट स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि फंलदाजीसाठी आयर्लंडला आमंत्रीत केले. फलंदाजीसाठी आलेल्या आयर्लंडच्या फलंदाजांचा टीम इंडियाच्या गोलंदाजांपुढे निभाव लागला नाही. हार्दिक पंड्या तीन विकेट, अर्शदिप सिंग आणि बुमराह प्रत्येकी दोन विकेट आणि सिराज व अक्षर पटेल यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. त्यामुळे आयर्लंडला मोठी धावसंंख्या उभारता आली नाही आणि अवघ्या 96 या धावसंख्येवर आयर्लंडचा संपूर्ण संघ तंबुत परतला.

आयर्लंडने दिलेल्या 97 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली ही विस्फोटक जोडी सलामीला आली. विराट कोहली (5 चेंडू 1 धाव) स्वस्तात माघारी परतला मात्र कर्णधार रोहित शर्माने (37 चेंडू 52 धावा) अर्धशतकी खेळी करत टीम इंडियाला विजय सोपा करून दिला. विराट कोहलीच्या नंतर आलेल्या ऋषभ पंतने (26 चेंडू 36 धावा) सामन्याची सुत्र आपल्या हातात घेत संघाला विजय मिळवून दिला.